मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये पार पडतो आहे. नाशिकमध्ये राज ठाकरे आले आहेत. नाशिकमध्ये पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिना साजरा होतो आहे त्यामुळे नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. राज ठाकरे एका शाखा उद्घटनासाठी जात असताना त्यांचा ताफा १५ मिनिटं रस्त्यावर एकाच ठिकाणी थांबल्याचे दिसून आले.

राज ठाकरेंचा ताफा का थांबला?

सातपूर या ठिकाणी राज ठाकरेंच्या कारचा ताफा १५ मिनिटं एकाच ठिकाणी थांबला होता. यानंतर आता राज ठाकरेंना महत्त्वाचा फोन आला होता का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शुक्रवारी राज ठाकरेंनी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे यांच्यासह काळाराम मंदिरात पूजा आणि आरती केली.

हे पण वाचा- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? संजय राऊत म्हणाले, “ती वेळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी राज ठाकरे हे शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी रस्त्यातच अचानक त्यांचा ताफा थांबला. नाशिकच्या सातपूर भागात १५ मिनिटं राज ठाकरेंचा ताफा रस्त्यावर एकाच ठिकाणी थांबला होता. शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी जाताना अचानक ताफा थांबल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज ठाकरेंना महत्त्वाचा फोन आल्यानं ताफा थांबल्याची चर्चा होत आहे. मात्र ताफा का थांबला? याचे कारण गुलदस्त्यात आहे.