भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा समर्थक या निर्णयाचं कौतुक करत आहेत, तर विरोधक या निर्णयाने नोटबंधीचा निर्णय फसल्याचं सिद्ध झाल्याची टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्रकाराने नोटबंदी फसली का? असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरे संतापलेले पाहायला मिळाले. ते शनिवारी (२० मे) नाशिक दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते.

नोटबंदी फसली का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “मी या गोष्टी तेव्हाच बोललो होतो. मला जे प्रश्न विचारले जातात ते सरकारमधील लोक आल्यावर विचारले जात नाही. तेव्हा तोंड बंद असतं. मला हे प्रश्न विचारा म्हणून पत्रकारांना कुणी पाठवतं का?”

“नव्या नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नव्हतं”

आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटेबाबतच्या निर्णयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी नोटबंदी झाली त्याचवेळी एक भाषण केलं होतं. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी नोटा आणल्या, तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नव्हतं.”

हेही वाचा : विश्लेषण : दोन हजाराची नोट चलनातून बाद; आता पुढे काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”

“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.