शेतकऱ्यांना पीकविमा, प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला नाही. आता त्यावरूनच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “गतिमान वेगवान सरकार असल्याच सोंग करतंय. पिकविमा मिळेना , उसाचा अंतिम हप्ता ठरेना , प्रोत्साहनपर अनुदानाच तर मेळच लागेना. म्हणूनच सांगतो शेतक-यांनो कोल्हापूरच्या जनता दरबारात याचा जाब विचारायला यायला लागतय !!”, असं ट्विट राजू शेट्टी यांनी केलं आहे.

२०२३ च्या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजनांसाठी निधीची तरतूद केली. तसेच शेतकरी सन्मान योजनेचा निधी वाढवला, पीक विमा एक रुपयात सुरू केला. अश्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असल्याची जाहिरातही सरकारकडून केली जातेय. परंतु प्रत्यक्षात हे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे समोर येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदनही दिले. ‘राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्याची मागणी केलेली आहे”, असं यावेळी राजू शेट्टी म्हणाले.