इस्त्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराविरोधात परभणीत मुस्लीम बांधवांनी मोठा मोर्चा काढला. मोर्चात मुफ्ती व उलेमा धर्मगुरूंसह मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी परभणी पीपल्स बँकेसमोर मोर्चा अडवला.
मागील दोन महिन्यांपासून इस्त्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या बॉम्बहल्ल्यात निरपराध मुस्लिमांना प्राण गमवावे लागत आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने या विरोधात योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी मोहम्मदिया सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे सय्यद अब्दुल कादर यांनी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लीम बांधवांचा मोर्चा काढला. दुपारच्या नमाजानंतर मोर्चा ईदगाह मदानावरून निघाला. मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2014 रोजी प्रकाशित
गाझातील नरसंहाराविरुद्ध मुस्लीम बांधवांचा मोर्चा
इस्त्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराविरोधात परभणीत मुस्लीम बांधवांनी मोठा मोर्चा काढला. मोर्चात मुफ्ती व उलेमा धर्मगुरूंसह मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी परभणी पीपल्स बँकेसमोर मोर्चा अडवला.
First published on: 24-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally of muslim brothers in issue of gaza