डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना भाषणादरम्यान विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी काहीजणांनी आठवले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आठवलेंना अवघ्या काही मिनिटात आपलं भाषण आटोपत घ्यावं लागलं.

नामविस्तार दिनाच्या‘एक विचार एक मंच’पासून फारकत घेत आठवले गटाने आपला वेगळा मंच उभारला होता. त्यामुळे आठवले यांच्या भाषणाला विरोध करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. याठिकाणी घोषणाबाजी करत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी परिस्थिती आटोक्यात ठेवली.

justin trudeau,
जस्टिन ट्रुडो यांच्यासमोरच खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, भारताकडून निषेध; कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाठवले समन्स
The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास

दरवर्षी नामविस्तार दिन सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक संघटनेचा स्वतंत्र मंच उभारण्यात येतो. मात्र, यावर्षी एकाच मंचावरुन हा सोहळा पार पाडायचा, असा ठराव दलित संघटनांनी मंजूर केला. नामांतराच्या या चळवळीत रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. परंतु, यावर्षी कधी नव्हे ते सर्व संघटना एकत्र येऊनही आठवले यांनी त्यांच्यात सहभागी होण्यास नकार दिला होता.