शिवसेना ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. मूळ शिवसेना कोणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तर निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजुने निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच वाढला आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केला आहे.

संजय राऊतांच्या विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी दोन ओळींची एक कविताही म्हटली आहे. संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता रामदास आठवले म्हणाले, “चोर कोण आहे? ते सगळ्यांनी पाहिलं आहे. तुरुंगात कोण जाऊन आलं, हेही सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे विधिमंडळाला चोर म्हणणं, ही गोष्ट अजिबात बरोबर नाही.”

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

हेही वाचा- “संजय राऊत हे महाराष्ट्रात आग लावत फिरणारं कार्टं”, शहाजी बापू पाटलांची खोचक टीका!

कविता सादर करत रामदास आठवले पुढे म्हणाले, “ते ४० जण नाहीत चोर… संजय राऊतांनी करू नये शोर… संजय राऊतांनी कितीही शोर केला तरी ते ४० आमदार हिंमतवाले आहेत. ते उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन बाहेर पडलेले आमदार नाहीत. उलट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच त्यांनी शिवसेनेतून बाहेर केलं आहे. ते शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत.”