दापोली येथील कथित साई रिसॉर्टच्या गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना ( शिंदे गट ) ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अलीकडे अटक केली आहे. सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमागे रामदास कदम यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केली. याला आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना ( ठाकरे गट ) नेते अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, “सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईत माझं हात, पाय आणि डोकेही नाही. महाराष्ट्राला माहिती आहे, मी समोर अंगावर जातो, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कधीच केलं नाही. ईडी माझं ऐकणारी असती, तर अनिल परबांना आतमध्ये टाकण्यास सांगितलं असतं. कारण, अनिल परबांनी माझ्या मुलाला प्रचंड त्रास दिला. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला होता. उद्धव ठाकरेंनी अनिल परबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न केला.”

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
maharashtra political crisis eknath shinde
चावडी : एकनाथांचा ‘उदय’ !
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”

हेही वाचा : शीतल म्हात्रे प्रकरणाला वेगळं वेळण, प्रियंका चतुर्वेदींनी केली प्रकाश सुर्वेंच्या मुलाच्या अटकेची मागणी; नक्की काय म्हणाल्या?

“अनिल परबांनी सदानंद कदमांना फसवलं आहे. हे स्वत: वकील असल्याने सर्व कागदपत्रे स्वत:च्या नावावर ठेवली नाहीत. परवानगीचा अर्ज आणि लाईट बिल अनिल परबांच्या नावावर आहे. सदानंद कदमांना यांना अनिल परबांनी बळीचा बकरा बनवलं आहे. सदानंद कदमांचा काही संबंध नसेल तर निश्चित ते बाहेर पडतील. याप्रकरणात अनिल परबांची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी रामदास कदमांनी केली.

हेही वाचा : “जगताप कुटुंब फोडण्यासाठी…”, लक्ष्मण जगताप यांच्या बंधुने व्यक्त केली खदखद; म्हणाले…

खेडमधील सभेबद्दल विचारलं असता रामदास कदमांनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांचा धसका घेतला होता. त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बोलवावी लागली. त्यांच्या पाठीशी कोकण नव्हतं, उभा महाराष्ट्र होता. १९ तारखेला होणार सभा कोकणवासीयांची असणार आहे. कोकणवासीय एकनाथ शिंदे आणि माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत,” असा विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केला.