रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण झाले अलिबागकर!

अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आज दोघांनी लावली होती हजेरी

शाहरूख खान, जुही चावला, अक्षय खन्ना पाठोपाठ आणि दीपिका पदूकोण व रणवीर सिंग अलिबागकर झाले आहेत. मापगाव ग्रामपंचायत हद्दीत दोघांनी ९९ गुंठे बिनशेती जागा आणि घर खरेदी केली आहे. अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आज या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली. यावेळी दोघेही कार्यालयात उपस्थित होते.

अलिबाग तालुका गेल्या काही वर्षात वीकेंण्ड डेस्टिनेशन म्हणून नावारुपास आला आहे. मुंबईतून सागरी मार्गाने अवघ्या काही तासात पोहोचणे शक्य असल्याने देशभरातील गर्भश्रीमंत, उद्योजक, सिनेकलाकार यांनी यापरिसरात गुंतवणूक सुरु केली आहे. टाटा, बिर्ला, सिंघानिया, मित्तल या उद्योजकांनी यापुर्वीच अलिबाग परिसरात आपली घरे घेतली आहेत.

रवीशास्त्री, सचिन तेंडूलकर यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनी अलिबागमध्ये गुंतवणूक केली आहे. तर शाहरूख खान, जुही चावला, अक्षय़ खन्ना बॉलीवूड कलाकारांनी यापुर्वीच आपली घरे अलिबाग परीसरात घेतली आहेत. यात आता रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण यांची देखील भर पडली आहे. दोंघानी मापगाव ग्रामपंचायत हद्दीत तब्बल ९९ गुंठे बिनशेती जागा आणि त्यावर असलेले घरं खरेदी केली. या व्यवहाराची सोमवारी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद करण्यात आली. यावेळी दोघांना पहाण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ranveer singh and deepika padukone become alibagkar msr

ताज्या बातम्या