रत्नागिरी – दुय्यम निबंधक कार्यालय-रत्नागिरी येथून नऊ गुंठे जमिनीचे खोटे खरेदी खत तयार करुन १२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज लक्ष्मण जाधव (रा. फ्लॅट नं. ए-४, ए. विंग, आकार अमृतवेल, नाचणे रोड, रत्नागिरी) या संशयिताविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ डिसेंबर २०२३ ते १६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत दुपारी साडेबाराच्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालय-रत्नागिरी येथे घडली.
मनोज लक्ष्मण जाधव याने ११ डिसेंबर २०२३ ते १६ ऑगस्ट २०२४ या मुदतीत प्रसाद सुमंत साळवी, सुहासिनी सुमंत साळवी, स्मिता सुमंत साळवी यांच्या कसोप येथील सर्व्हे नं १३७ / १६ मधील ९ गुंठे जमिनीचे मुखत्यारी हक्क असलेले संशयित मनोज जाधव यांनी सर्व्हे नं. १३७ / १६ मधील नऊ गुंठे जमिनीचे खोट दस्तऐवज तयार करुन त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय रत्नागिरी येथे खरेदीखत तयार करुन घेतले. तसेच या जमिनीचा व्यवहार करुन देण्यासाठी एकूण १२ लाख रुपये स्विकारुन फिर्यादी राजेश हनुमंत कांदळकर (वय ५८, रा. कुर्ला- टर्मिनस जवळ, सी-२ अमेय सी एच. एस. नवीन टिळक नगर, चेंबुर-मुंबई (कुलमुखत्यार आदित्य राजेश कांदळकर) यांची फसवणूक केली. या प्रकरणी राजेश कांदळकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी खोटे दस्ताऐवज तयार करुन फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
