रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत शिंदे यांच्या बागेतून ७ हापूस आंबा (Hapus Mango) पेट्या अहमदाबाद येथे रवाना झाल्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा पेट्या पाठवण्याचे त्यांचे हे सातवे वर्ष आहे. त्यांनी बदलत्या हवामानाचा आणि वातावरणाचा अंदाज घेत शेतीत मेहनत घेतली. त्याला वातावरणाचीही साथ मिळाली. यामुळे त्यांना मागील ६ वर्ष जानेवारी ते फेब्रुवारीमध्येच हापूस आंब्याची पहिली पेटी परजिल्ह्यात पाठवण्याचा मान मिळवला आहे.

गणेशगुळे येथील शशिकांत शिंदे अनेक वर्ष आंबा व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात हापूस कलमांची लागवड केलेली आहे.

हेही वाचा : बांगलादेशची Mango Diplomacy: पंतप्रधान मोदी आणि ममता दीदींसाठी पाठवले २६०० किलो आंबे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीच्या काळात पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा परजिल्ह्यात पाठवण्याची पद्धत होती. परंतु बदलत्या हवामानाचा व वातावरणाचा अंदाज घेऊन त्यांनी बागेमध्ये मेहनत केली. त्याला मिळालेली वातावरणाची साथ यामुळे गेली ६ वर्ष ते जानेवारी ते फेब्रुवारीमध्येच पहिली हापूस आंबा पेटी पाठवण्याचा मान मिळवत आहेत. त्यामुळे या वर्षातही पहिली हापूस आंबा पेटी बाहेरच्या मार्केटला पाठवण्याचा मान त्यांना मिळालेला आहे.