रत्नागिरी – रत्नागिरी शहरातील मिकरवाडा येथील एका मोबाइलच्या दुकानात फर्नीचरचे काम करताना झालेल्या वादावादीत मामाने भाचाच्या छातीत धारदार शस्त्राने वार करुन ठार मारले. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स सहानी ( वय २६) रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्रिन्स याचा त्याच्याच दोन साथीदारांनी सुतारकामासाठी वापरल्या जाणाऱ्या आरीने निघृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच खून करणारा प्रिन्स याचा मामा असून त्याचे मामाच्या मुली बरोबर प्रेम संबंध होते. यावरुन झालेल्या वादावादीत हा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
प्रिन्सवर दोन साथीदारांनी सुतार आरीने हल्ला करून त्याचा खून केल्या नंतर त्याचा तिसरा कामगार तिथेच बसून होता. पोलिसांनी त्याच्या मदतीने दोन्ही संशयित आरोपींचं लोकेशन शोधून त्यांना रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यत सुरु होते.