उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभय असल्यामुळे राणा दाम्पत्य काहीही वक्तव्य करतात. राणांना फडणवीसांनी आवर घातली पाहिजे, असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. याला आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारला ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे, अशी टीका रवी राणांनी बच्चू कडूंवर केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

रवी राणा म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांबरोबर ११-१२ वर्षापासून आहे. सुख आणि दु:खात एकत्र राहणारे व्यक्ती आम्ही आहोत. पळ काढणारे नाहीत. बच्चू कडू कधी इकडे कधी तिकडे असतात. त्यांनी सल्ला देण्याचं काम करू नये.”

हेही वाचा : “यशोमती ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले…

“मला पाडण्यासाठी सर्व नेते निवडणुकीत एकत्र येतात. पण, जनता नेहमी माझ्याबरोबर असते. बच्चू कडूंना आवर घालण्याची गरज आहे. सरकारला ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे. आम्ही कधी मंत्रीपद, तिकीट किंवा कोणतं पद मागितलं नाही,” असं रवी राणांनी म्हटलं.

हेही वाचा : “रामाने विभीषणाला फोडलं होतं”, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बच्चू कडूंचं वक्तव्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर राहून जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प घेऊन मी काम करतोय,” असं रवी राणांनी सांगितलं.