नगर : शहराची ओळख असलेल्या सिद्धीबागेचे (कै. बाळासाहेब देशपांडे उद्यान) खासगीकरणातून नूतनीकरण करण्यात आले असून तिचे लोकार्पण भाजप खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी एकत्रितपणे केले. नूतनीकरणानंतर तेथे छोटी रेल्वे, मत्स्यालय, कारंजे, सेल्फी पॉइंट, खवय्यांसाठी चौपाटी सुरू करण्यात आली आहे. तसेच उद्यानाचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आणण्यात आला आहे. उद्घाटनप्रसंगी सूरसंगीत मैफिलीचेही आयोजन करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मी व आमदार जगताप शहर विकासाच्या योजना राबवत आहोत. पुढील एक वर्षांत विकसित शहर म्हणून नगरची ओळख होईल. सिद्धीबागेच्या माध्यमातून नगरकरांच्या जुन्या आठवणीला नव्याने उजाळा मिळणार आहे. ‘आय लव सिद्धीबाग’ या उपक्रमातून सिद्धीबागेचे रूप बदलले आहे, असे या वेळी खा. विखे म्हणाले.

आमदार जगताप म्हणाले, केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात जुने उद्यान म्हणून सिद्धीबागेची ओळख आहे. या उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी पुढाकार घेतला. अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी नूतनीकरणाची माहिती दिली. महापालिका व ओम डिजिटल संस्थेच्या माध्यमातून नूतनीकरण करून उद्यान आता नगर करण्यासाठी खुले करण्यात आले आहे.  या वेळी महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, सभापती पुष्पा बोरुडे, व्याख्याते गणेश शिंदे, माजी उपमहापौर मालण ढोणे, अनिल बोरुडे, दीपक सूळ, निखिल वारे, संजय झिंजे, अजय चितळे, सुप्रिया जाधव, कालिंदी केसकर, गायिका संन्मिता शिंदे, शिल्पकार प्रमोद कांबळे, विठ्ठल बुलबुले, सुहास मुळे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation open city dwellers privatization renewal campus cctv ysh
First published on: 22-04-2022 at 00:18 IST