रत्नागिरी : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नगिरी जिल्ह्यत परतीच्या पावसाचे वातावरण गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झाले असून शुक्रवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्यच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सर कोसळल्या. शुक्रवारी दुपारपर्यंत कडक उन पडले होते. मात्र सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली. वीजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढत गेला. कार्यालयीन कामकाज पूर्ण करुन अनेक कर्मचारी घरी परतण्याच्या तयारीत असताना पावसाने गाठले.त्यामुळे अनेकांनी मिळेल तेथे आसरा घेतला. शहरातील रस्त्यांवरून थोडय़ाच वेळात पाण्याचे ओहोळ वाहू लागले. दिवसभर उष्म्याने त्रस्त रत्नगिरीकरांना गारव्याचा दिलासा मिळाला. ढगांचा गडगडाट रात्री उशीरापर्यंत चालू होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 राजापूर, लांजा, संगमेश्व्र, चिपळूण इत्यादी तालुक्यांमध्येही गेले दोन दिवस दुपारनंतर वीजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. संगमेश्व्र, चिपळूण तालुक्यात त्याचा विशेष जोर होता . लांजा तालुक्यात सायंकाळी हलका पाऊस पडला. गेल्या १ जूनपासून शुRवारी ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यत एकूण सरासरी ३ हजार ४५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यची दीर्घकालीन वार्षिक सरासरी ३ हजार ३६४ मिलीमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत ४ हजार २०८ मिलीमीटर पाऊस पडला. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे हे प्रमाण जास्त होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return rain ratnagiri district rainy weather atmosphere ysh
First published on: 01-10-2022 at 00:02 IST