“शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं”, या भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रश्नाचा शरद पवारांचे नातू आणि जि. प. सदस्य रोहित पवार यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. “गरजी पडली की, साहेबांचा (शरद पवार) सल्ला, गरज पडली की बारामतीत येऊन साहेबांचे कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की विचारायच साहेबांनी काय केलं?” असे उत्तर देत भाजपाचं राजकारण डबल ढोलासारख असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर येथे महाजनादेश यात्रेची सभा झाली होती. या सभेत बोलताना केंद्रीय गृहंमंत्री आणि भाजपाध्यक्ष राष्ट्रीय अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगाव” अशी टीका केली होती. अमित शाह यांच्या टीकेला पवार यांचे नातू रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. “गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येऊन साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत.” असे रोहित पवार म्हणाले.

“महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दीनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही, तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे. साहेबांचं राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

आता जमीन नांगरायची वेळ आलीयं-
पक्षाला लागलेल्या गळतीवरही रोहित यांनी भाष्य केलं आहे. “एक लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या मातीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची व विकासांच्या राजकारणाची श्रृखंला थोरामोठ्यांच्या आशिर्वांदाने आपण तरुणांनाच पुढे घेऊन जावी लागणार आहे. सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पिठ पण दुसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमीनच नांगरायची वेळ आलीयं. चांगली मशागत करुन ठेवुया”, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar replies to amit shah on his comment about sharad pawar bmh
First published on: 03-09-2019 at 13:00 IST