NCP MLA Rohit Pawar Tweet: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरु होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रोहित पवार यांनी आंदोलन केलं. पण, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. आज पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून रोहित पवार यांचे एक ट्वीट चर्चेत आले आहे. रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील नान्नजमधील अमर चाऊस यांनी MIDC साठी उद्योगमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहीलं असल्याचे सांगत ट्वीट केले आहे. यामध्ये रोहित यांनी अमर यांच्या रक्तलिखित पत्राचा फोटो सुद्धा जोडला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “माझ्या मतदारसंघातील MIDC चा मुद्दा उग्र रुप धारण करतोय. विनंती, अर्ज, आंदोलन, उपोषण ही सर्व हत्यारं वापरल्यानंतरही सरकार MIDC ची अधिसूचना काढत नसेल तर हा माझ्या मतदारसंघातील युवांवर होणार घोर अन्याय आहे. नान्नजमधील अमर चाऊस यांनी तर MIDC साठी उद्योगमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहीलं. माझी युवांना विनंती आहे की, असा प्रकार कुणीही करु नये पण आता तरी सरकारने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.”

रोहित पवार ट्वीट

हे ही वाचा<< “जमीन नीरव मोदीची आहे, पण…”, ईडीचा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणावरून चर्चा सुरु असताना एमआयडीसीला मिळणारी जमीन ही नीरव मोदीची असल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत केला होता. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना “कर्जतला एमआयडीसी करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. सदर जमीन नेमक्या कोणत्या नीरव मोदींची आहे यावर चौकशी केली जाईल” असं आश्वासन दिलं होतं.