खासदार रामदास आठवले यांचे समर्थक बाळासाहेब गायकवाड यांनी रिपब्लिकन पँथर्स पार्टी हा नवा पक्ष काढून त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहे आहेत.
गायकवाड यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, देशात धर्माध व जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी रिपब्लिकन पँथर पार्टीने काँग्रेस राष्ट्रवादीच्या समवेत लोकसभा निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना पािठबा देण्याचा निर्णय घेतला. खासदार वाकचौरे यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे त्यांच्या पक्षांतरामुळे मूठभर लोक त्यांना विरोध करीत असले तरी त्यांचा हा विरोध व्यक्ती व विचारस्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2014 रोजी प्रकाशित
भारिपचे बाळासाहेब गायकवाड वाकचौरे यांच्या प्रचारात सक्रिय
खासदार रामदास आठवले यांचे समर्थक बाळासाहेब गायकवाड यांनी रिपब्लिकन पँथर्स पार्टी हा नवा पक्ष काढून त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहे आहेत.
First published on: 05-04-2014 at 03:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpps balasaheb gaikwad active in vakacaure promotion