तासगाव येथील बाजार समितीच्या सौद्यात बेदाण्याला प्रतिकिलो ३९० रुपये भाव मिळाला. गेल्या आठवडय़ात ३७१ रुपये प्रतिकिलो असणारा दर आता ३९० रुपयांवर पोहोचल्याने बेदाणा उत्पादकांना ‘अच्छे दिन आये है’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तासगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दर आठवडय़ाला बेदाण्याचे सौदे निघतात. चालू वर्षी बेदाणा दरात तेजीचे चित्र असून तब्बल ४४० टन बेदाण्याची आवक झाली आहे. यापकी ३८० टन म्हणजे २८ हजार ४३० बॉक्सची विक्री झाली. तुरची येथील सुनील पाटील यांच्या ५०० किलो बेदाण्याची चंद्रसेन ट्रेड्रिंग कंपनीने प्रतिकिलो ३९० रुपये दराने खरेदी केली. आतापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर असून बेदाणा दराने उच्चांक केला आहे.
अन्न सौद्यामध्ये हिरवा बेदाणा १७५ रुपयांपासून ३९० रुपयांपर्यंत खरेदी करण्यात आला. तर पिवळा बेदाण्याचा दर १७५ ते २५० रुपये आणि काळय़ा बेदाण्याचा दर ४५ ते ९५ रुपये किलो असा राहिला. बेदाणा दरात तेजी निर्माण झाली असून त्यामुळे आवकही वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs 390 rate to raisin in tasgaon market of sangli
First published on: 26-07-2014 at 03:36 IST