लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीसोबत जाणार की, महाविकास आघाडीसोबत, याचा निर्णय अद्याप त्यांनी जाहीर केलेला नाही.

महादेव जानकरांचं अद्याप तळ्यात मळ्यात सुरु आहे. गेली अनेक वर्षं महायुतीसोबत राहूनदेखील महायुतीमधील नेते विचारत नसल्याची खंत महादेव जानकरांनी अनेकदा बोलून दाखवली. आता महादेव जानकरांनी आपण नेमके महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत? यावर सूचक भाष्य केले. महादेव जानकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले असून माढा आणि परभणी या दोन मतदारसंघांमधून ते निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत आहेत. आता त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत “शरद पवारांनी आम्हाला एक जागा देण्याचे मान्य केले आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करावी, तसेच काँग्रेसने एक मतदारसंघ आणि ठाकरे गटाने एक मतदारसंघ ‘रासप’साठी सोडावा”, असं मत व्यक्त केलं आहे.

What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

हेही वाचा : Electoral Bonds: “उद्याच सगळी माहिती सादर करा”, सर्वोच्च न्यायालयाचे SBI ला आदेश; मुदतवाढीच्या अर्जावरून फटकारलं!

महादेव जानकर दोन मतदारसंघांतून लोकसभा लढवणार?

माढा आणि परभणी या दोन मतदारसंघांतून लोकसभा लढवण्यासाठी महादेव जानकर गेल्या काही दिवसांपासून चाचपणी करत आहेत. यासाठी काय-काय तयारी केली, याबाबत सांगताना जानकर म्हणाले, “आम्ही गटनिहाय, बूथनिहाय, गणनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी केली आहे. आमची टीम राज्यभर फिरत असून प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवटे यांच्या माध्यमातून चांगली टीम उभी केली. मला परभणी जिल्ह्यातून रोज शंभर फोन येतात, ते सर्व समाजाचे फोन असतात. ‘साहेब तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळाला तर फार चांगलं होईल’, अशी त्यांची भावना असते. अशीच परिस्थिती माढा मतदारसंघाचीदेखील आहे. त्यामुळे माझी पंचाईत झाली. पण मी आता असा निर्णय घेतला आहे की, दोन्हीकडूनदेखील निवडणूक लढवायची”, असं महादेव जानकर म्हणाले.

महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडी?

महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडी, याबाबत जानकर म्हणाले, “अजून कोणाबरोबर जायचं हे ठरलं नाही. मात्र, महाविकास आघाडीने आम्हाला निमंत्रण दिलेले आहे. शरद पवारांनी आम्हाला निमंत्रण दिले. बाकी महायुतीने निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नही नाही. शरद पवारांनी एक जागा देऊ केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने याबाबत भूमिका स्पष्ट करावी. याबद्दल काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट काही बोलत नाही. काँग्रेसने आणि शिवसेना ठाकरे गटाने एक-एक जागा सोडली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. यामध्ये परभणी, सांगली आणि माढा या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत”, असं महादेव जानकर म्हणाले. दरम्यान, महादेव जानकर यांच्या या मागणीवर महाविकास आघाडी काय भूमिका घेते, ते पाहणं ओत्सुक्याचं असणार आहे.