नागपुरात RSS मुख्यालयात मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण, ‘भारत माता की जय’चा जयघोष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूरमधील मुख्यालयातही आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नागपुरात RSS मुख्यालयात मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण, ‘भारत माता की जय’चा जयघोष
मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (फोटो-एएनआय)

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह संचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. आज शासकीय कार्यालये तसेच अन्य संस्थामध्येही ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूरमधील मुख्यालयातही आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी भागवत यांच्यासह आरएसएसमधील वरिष्ठ पदाधिकारी तसेच स्वसंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर येथे राष्ट्रगीत आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“शिंदेंकडून गृह आणि अर्थ खात्याची मागणी झाली पण फडणवीसांनी…”; ‘मातोश्री’चा उल्लेख करत मिटकरींचं विधान
फोटो गॅलरी