Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates : मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्यांकडून होत असलेल्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या आत्महत्याप्रकरणानंतर संबंधित घराणं हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी संबंधित असल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. तसंच, राज्य महिला आयोगानेही याप्रकरणी आता दखल घेतली आहे. दरम्यान, वैष्णवीचं माहेर असलेल्या कस्पटे कुटुंबियांना आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट दिली. मात्र, या भेटीदरम्यान, मराठा समाजाने त्यांना घेरलं.

“मयुरी जगताप व अश्विनी कस्पटे या व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा. अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा”, असं धनंजय जाधव, अश्विनी खाडे यांनी चाकणकर यांना सुनावले.

तसंच, “आता अति होतंय, मागच्या प्रकरणातही असंच झालं”, असं म्हणत त्यांनी रुपाली चाककणकर यांना जाबही विचारला. यानंतर मराठा समाजाने वैष्णवी हगवणे हत्या व मराठा लग्न समारंभ विषयावर संबोधन झाले.

रुपाली चाकणकर पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

राज्य महिला आयोगाकडे वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे आणि जाऊ मयुरी हगवणे या दोघींनी एकमेकांविरोधात ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती, असं रुपाली चाकणकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या. एकाच दिवशी या दोघींनी एकमेकांविरोधात मेलद्वारे तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लागलीच बावधन पोलीस ठाण्यात यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, असंही चाकणकरांनी स्पष्ट केलं. दरम्यान हे प्रकरण कौटुंबिक असल्याने याप्रकरणी समुपदेशनासाठी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना बोलावलं होतं, असंही चाकणकर म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणण्यासाठी सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणात पसार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुळशीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि त्यांचे चिरंजीव सुशील हगवणे यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. एच. बारी यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.