राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतात. तीन दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्वीट करत नवाब मलिक आणि नाना पटोलेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अमृता या पातळी सोडून बोलत असल्याची टीका देखील त्यांच्यावर झाली. नाना पटोले यांनी त्यांच्या टीकेवर उत्तर देताना त्या आमच्या सूनबाई असल्याचं म्हटलं होतं. अशातच नुकत्याच मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अमृता फडणवीसांना त्यांच्या ट्वीटवरून सुनावलं आहे.

“काय सांगायचं आमच्या माजी मिसेस मुख्यमंत्री वहिनीसाहेबांबद्दल. आमचे विरोधी पक्षनेते असलेले भाऊ आमच्या वहिनींना कुठल्याच गोष्टीत अडवतच नाही. हे सांगताना मला अतिशय दुःख होतंय की अमृता फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी म्हणून जे पद त्यांच्याकडे आहे, त्याची गरिमा धुळीस मिळवली आहे. “Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है _नामर्द है !”, असं त्या बोलल्या. यापूर्वी आपला कोणत्याच पक्षाशी संबंध नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या, म्हणून अमृता फडवीसानी त्या कोणत्या पक्षाच्या आहेत हे स्पष्ट करावं,” असं आव्हान रुपाली पाटलांनी त्यांना दिलं.

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य

“एका समाजसेविकेची अशी भाषा समाजात कशी चालणार. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री काम करत नसतील, तर त्यावरून नक्कीच टीका करा,” असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडवीसांना देखील अमृता फडणवीसांना आवरा असं म्हटलं. भाऊराया वहिनी खूप अंधाधुंद वागताहेत, त्यांना आवरा. यावेळी त्यांनी अमृता फडणवीसांना काही प्रश्न विचारले. “शेतकऱ्यांना गाडीखाली कोणी चिरडलं, शेतकऱ्यांना साला कोणी म्हटलं, कर्मचाऱ्यांची खाती आपल्या बँकेत कोणी वळवली, याची उत्तर द्या,” असं त्या अमृता फडणवीसांना म्हणाल्या.

“वहिनी स्वतःला आवरा. जर भाऊ तुम्हाला आवरू शकत नसतील तर तुम्हीच स्वतःला आवरा. अन्यथा मानसिक संतुलन बिघडल्यास तुम्हाला उपचार घ्यावे लागतील. देवेंद्र फडणवीसांची नावडती बहीण म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्वत:ला आवरा,” असं रुपाली पाटील अमृता फडणवीसांना म्हणाल्या.