सावंतवाडी: आरोंदा येथे व्हिसाची मुदत संपूनही बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका रशियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

​युरी व्लादिमीर बोझको (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या रशियन नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युरी बोझको याचा व्हिसा आणि भारतात राहण्याची मुदत संपली होती, तरीही तो आरोंदा परिसरात राहत असल्याचे समोर आले.

​या माहितीनंतर पोलिसांनी त्याच्यावर परदेशी नागरिक अवैध वास्तव्य कायद्यानुसार (Foreigners Act) कारवाई केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.