तुळजापूर : अश्विन पौर्णिमा व मंदिर पौर्णिमेनिमित्त कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर नगरीत येणार्‍या सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात मंदिर संस्थानच्यावतीने स्वागत करण्यात आले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही अश्विन पौर्णिमेला सोलापूरनगरीच्या मानाच्या काठ्या घाटशीळ मार्गे तळजापूरनगरीत जगदंबेचा जयघोष करीत दाखल झाल्या. पूर्वपरंपरेनुसार तुळजाभवानी देवीचे माहेरघर असलेल्या सिंदफळ येथे मुक्काम करून मंदिर पौर्णिमेला तुळजापूरनगरीत घाटशीळ मार्गे शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्यांचे आगमन झाले.

हेही वाचा : शिंदे गटाच्या खासदारानंतर अजित पवार गटातील आमदार देणार राजीनामा? स्वत:च केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

दरम्यान अश्विन पौर्णिमेच्या रात्री जगदंबेच्या छबिन्यात या काठ्यांची रात्री हजेरी होती. सोबत हजारो भक्त, गोंधळी, आराधी, वासुदेव यांच्यासह सवाद्य शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांसह छबिना निघाला. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार शारदीय नवरात्र महोत्सवापासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत चालणार्‍या तुळजाभवानी मातेच्या महोत्सवाची शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांसह रविवार, २९ ऑक्टोबर रोजी छबिना मिरवणूक तसेच सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी अन्नदान महाप्रसाद, रात्री छबीना मिरवणुकीने यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.