राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या केतकी चितळे हिचा अभिमानच वाटतो, असे वादग्रस्त विधान रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. त्यामुळे सोलापुरात खोत यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण : तृप्ती देसाईंचा केतकीला पाठिंबा; म्हणाल्या, “तिने जी पोस्ट टाकलीय त्यामध्ये पवार…”

शासकीय विश्रामगृहात खोत हे सोमवारी दुपारी आले असता त्यांच्या दालनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात टाळ मृदुंग घेऊन थेट प्रवेश केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बाबर, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली ५० कार्यकर्ते थेट दालनात घुसले आणि सदाभाऊ खोत यांना पांडुरंगाने सद्बुध्दी द्यावी म्हणून प्रार्थनावजा घोषणा देऊ लागले. नंतर या कार्यकर्त्यांनी खोत यांना जाब विचारत गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावेळी खोत हे एकटेच खुर्चीवर शांतपणे बसून या रोषाला सामारे जात होते. तथापि, हा गोंधळ सुरू असताना अखेर तेथे धावून आलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या आंदोलक कार्यकर्त्यांना दालनातून बाहेर काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वातावरण शांत झाल्यानंतर खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केतकी चितळेच्या विधानाचे नाही तर तिने न्यायालयात कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतः आपली बाजू मांडल्याचे आपणांस कौतुक वाटले आणि तिचा अभिमानही वाटला, असा खुलासेवजा दावा केला. चितळे हिने पवारांवर काही बोलले तर तो गुन्हा ठरतो आणि राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविषयी बेताल विधान केले की तो गुन्हा कसा ठरत नाही, असा सवालही खोत यांनी यावेळी उपस्थित केला.