२०१२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारकडून माझा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या विशेष कार्यक्रमात त्यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?

“२०१२ ला इंदापूरमध्ये उसाचं आंदोलन सुरू होतं. चंद्रकांत नलवडे नावाचा शेतमजुराचा पोरगा टेम्पोच्या आडोशाला उभं होता. तो आंदोलन बघत असताना पोलिसांनी समोरून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी मला येरवड्याच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. बाहेर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलक रस्त्यांवर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी आत येऊन मला सांगितलं की जामीन स्वीकारा आणि बाहेर येऊन सगळं शांत करा. मी जामीन स्वीकारून बाहेर आलो.”

हेही वाचा – Sadabhau Khot : शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले, “शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्यावेळी मी बाहेर आलो, त्यावेळी तीन ते चार गाड्या बाहेर उभ्या होत्या. या गाडीत बसा, त्या गाडीत बसा असं मला पोलीस सांगत होते. मी विचार करत होतो, की यांनी माझ्यासाठी एवढ्या चांगल्या गाड्या का आणल्या? मी डीवायएसपीचं नाव घेणार नाही. मला त्यांच्या नोकरीवर गंडांतर आणायचं नाही. त्यानं मला चालत-चालत हळूच सांगितलं की भाऊ जिथं-जिथं एक दोन ठिकाणी आंदोलनाची दंगल चालू आहे, तिथं तुम्हाल न्यायचं आहे आणि तुमचं एन्काऊंटर करायचं आहे. त्यामुळे मी टेम्पोत बसून आंदोलनांच्या ठिकाणी गेलो”, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.