गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भातील उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी चर्चा करतील. पण, राज ठाकरेंनी फोन उचलला पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हटल्याचं बोललं जात आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १९६६ पासून १९९० पर्यंतची भाषणे राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी ध्वनीमुद्रीत केली होती. ती भाषणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी उद्धव ठाकरेंना हवी आहेत. त्याकामात मदत करण्यासाठी राज ठाकरे फोन उचलणार असतील, तर बोलण्यास तयार आहे, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना म्हटल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा : “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या RSSच्या कुशीत भाजपाचा जन्म”, नाना पटोलेंची टीका

याबद्दल विचारल्यावर संदीप देशपांडे म्हणाले, “फोन उचलण्यास तयार असतील, तर बोलणार? याचा अर्थच मला कळत नाही. राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या डोक्यातच कसं आलं? जे स्वत: लोकांचे फोन उचलत नाहीत, त्यांच्याच मनात ही भीती असू शकते. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा फोन राज ठाकरे उचलतात.”

हेही वाचा : अंबादास दानवेंबरोबरच्या राड्यानंतर संदीपान भुमरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आवाज वाढला कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘याचा राजकीय युती किंवा प्रस्ताव असा संबंध जोडू नये,’ असेही उद्धव ठाकरेंनी तेव्हा पत्रकारांना म्हटलं आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर संदीप देशपांडे यांनी म्हटलं, “कोण संबंध जोडत आहे? हे सर्व स्वत:च बोलायचं का? २०१४ आणि २०१७ साली आम्ही युतीचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी फोन उचलले नाहीत.”