सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना समाजमाध्यमातून फेकन्यूज प्रसारित केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – धाराशिव : प्रचार थांबला, उद्या मतदान; दहा तालुक्यांतील दोन हजार १३९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया

हेही वाचा – पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुली कार्यालय – प्रकाश आंबेडकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविकांत पिंगळे या बनावट नावाने अज्ञात व्यक्तीने समाजमाध्यमामध्ये दीड लाखांच्या मताधिक्याने विशाल पाटील विजयी होणार, पोलिसांच्या जिल्हास्तरीय अहवालात निष्पन्न अशा मथळ्याची बातमी समाजमाध्यमातून प्रसारित केली होती. पोलीस प्रशासनाकडून असा कोणताही अधिकृत अहवाल प्रसारित केला नसताना चुकीची माहिती देऊन लोकामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने हे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या प्रकाराची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत अज्ञाताविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.