सांगली : कृष्णा कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. औदुंबर (ता. पलुस) येथील श्री दत्त मंदीराच्या गाभाऱ्यात बुधवारी कृष्णामाईने प्रवेश केला. मंदिरातून देव बाहेर घेऊन जाण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. त्यानंतर श्री दत्त देवाची पूजाअर्चना देवघरात सुरू झाली.
हेही वाचा – सोलापूर : करमाळ्यात माहेरी राहणाऱ्या पत्नीचा सुपारी देऊन खून, पतीसह सहाजण अटकेत
सांगली : कृष्णा कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. औदुंबर (ता. पलुस) येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात बुधवारी कृष्णामाईने प्रवेश केला. मंदिरातून देव बाहेर घेऊन जाण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. pic.twitter.com/8ymWkVUa3P
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) July 24, 2024
कृष्णा नदी पात्रात पाणी वाढल्यामुळे नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. मात्र, आमणापूर – अंकलखोप पूलावर वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. पाणी पातळी वाढत असल्यामुळे प्रवाशांनी माहिती घेऊनच प्रवास करावा. नागरिकांनी नदीकाठावर जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन पलुसचे तहसीलदार दिप्ती रिटे यांनी केले.