सामाजिक सलोख्याचा संदेश देत सांगलीत महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने रोझा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील शेकडो मुस्लीम बांधव या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. मनसे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांच स्वागत करत, त्यांना पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यात एकीकडे राजकीय आणि धार्मिक वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेची भूमिका समजावून न घेताच त्याला धार्मिक रंग दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मनसेच्या वतीने मात्र सांगलीत सामाजिक ऐक्याचा संदेश देत मुस्लीम बांधवांसाठी रोझा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या विश्रामबाग येथील जिल्हा कार्यालयासमोर गुरुवारी सायंकाळी इफ्तार पार्टी पार पडली.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका

जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून मुस्लीम बांधवांच्यासाठी या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात असंख्य मुस्लीम बांधवांनी इफ्तार पार्टीचा लाभ घेतला. जिल्हाध्यक्ष सावंत, उपाध्यक्ष संदीप टेंगले, जिल्हा सचिव जमीर सनदी, तालुका अध्यक्ष साजिद आगा शहराध्यक्ष दयानंद मलपे, अमित पाटील यांच्यासह मनसेचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.