शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसआयटी चौकशी लावण्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारने एसआयटी चौकशी लावण्याचं रेशनिंग सुरू केलं आहे. मागेल त्याला एसआयटी देण्यात येते. जे ४० आमदार ५० खोके देऊन फोडण्यात आले. तो काय व्यवहार होता याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. पण सरकार जे विषय संपले आहेत. जे विषय पोलीस आणि सीबीआयने संपवले आहेत, त्यावर एसआयटी स्थापन करून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहे. आम्ही सर्व तपासाला सामोरे जाऊ, पण तुम्ही तोंडावर पडाल, अशी टीका राऊतांनी केली.

शिंदे-फडणवीस सरकारला एसआयटी लावण्याची खाज सुटली आहे, अशी टीकाही राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरले आहेत.

हेही वाचा- “जे गाढव, नालायक असतात, ते…”, राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांचा हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाड म्हणाले, “राज्यात एखादं प्रकरण घडलं आणि सरकारने कारवाई नाही केली, तर सरकार शेपूट घालून बिळात बसलं, अशी टीका संजय राऊत करतो. दुसरीकडे, सरकारने कारवाई केली तर सरकार एसआयटीचा गैरवापर करतंय, असंही तो म्हणतो. या संजय राऊताला काही धंदा उरला नाही. राज्यात काही गोष्टी चुकीच्या घडत असतील तर त्याची चौकशी करण्याचं काम सरकारला करावं लागतं. ही सरकारची नैतिक जबाबदारी असते,” अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान त्यांनी संजय राऊतांचा गलिच्छ भाषेत उल्लेख केला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.