शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मयुर शिंदे असं या अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मयुरने फोनवरून संजय आणि सुनील राऊत यांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या धमकी प्रकरणामुळे संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली जात होती. परंतु हा मयुर शिंदे संजय राऊतांचा निकटवर्तीय असून राऊतांच्याच सांगण्यावरून त्याने हे धमकीचं नाटक केलं असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीने केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हे महाशय (मयुर शिंदे) सध्या भाजपा किंवा मिन्धे गटात असल्याचे समजले. कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो. एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीस पकडून शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला तसा. राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवले काय? काही विषय संवेदनशील असतात. याचे भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात.

मयुर शिंदे हा संजय राऊत आणि सुनील राऊतांचा निकटवर्तीय असून राऊतांच्या सांगण्यावरूनच त्याने संजय राऊत आणि सुनील राऊतांना फोन करून धमकी दिली होती. असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अधिक सुरक्षा मिळावी आणि लवाजमा वाढवा, यासाठी राऊत यांनी हा खोटारडेपडणा केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. तसेच सोशल मीडियावर राऊत आणि मयुर शिंदे यांचे एकत्र असलेले फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा >> एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेचा दावा करणाऱ्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदीप देशपांडे काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित करताना म्हणाले होते की, तुम्ही (राऊत) तुमच्याच माणसाला सांगताय की, मला धमकीचे फोन कर. तो माणूस फोन करून शिव्या घालण्याचं नाटक करतोय. त्याला सुनील राऊत शिव्या घालून उत्तर देत आहेत. मुळात यांचे गँगस्टर (माफिया/डॉन) लोकांशी कशा पद्धतीचे संबंध आहेत ते यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.