उद्धव ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त उद्धव ठाकरे गटाने षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले. तर दुसरीकडे विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येत आहे. षण्मुखानंद येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दमदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात बंडखोरी केलेल्या आमदारांवर खरपूश शब्दांत टीका केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत एका दगडाची गोष्ट सांगितली. ही गोष्ट ऐकल्यानंतर भाषण ऐकत असलेल्या श्रोत्यांनी शिट्ट्या वाजवत टाळ्यांचा कडकडाट केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाकरे गट-वंचित युती लवकरच तुटणार? उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले “मला मनापासून…”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत एका दगडाची कथा सांगितली. या कथेचा संदर्भ देत त्यांनी बंडखोरी केलेल्या शिंदे गताली आमदार आणि खासदारांवर खरपूस शब्दांत टीका केली. “एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी तलावात एक दगड फेकला. त्यांच्यासोबत अनेक लोक होते. त्यांच्यासोबत अनेक लोक होते. त्यांनी त्या लोकांना विचारले की दगड का बुडाला? कोणी म्हटलं की दगड जड होता. अनेकांनी वेगवेगळी कारणं दिली मात्र तिथे संजय राऊत नावाचा एक अतिशहाणा माणूस होता. तो म्हणाला की साहेब दगड यासाठी बुडाला कारण त्याने तुमचा हात सोडला. आम्हीही दगडच आहोत. आम्हाला बाळासाहेबांनी शेंदूर फासला आहे,” अशी रंजक कथा संजय राऊत यांनी सांगितली. तसेच बंडखोरी केलेले ४० दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>“नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही,” संजय शिरसाट आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले, “त्यांना गल्लीत…”

दरम्यान, राऊतांनी सांगितलेली दगडाची गोष्ट ऐकून श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. काही श्रोत्यांनी तर शिट्ट्या वाजवल्या. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनीदेखील शिंदे गटावर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes eknath shinde rebel group on occasion of balasaheb thackeray birth anniversary program prd
First published on: 23-01-2023 at 19:52 IST