scorecardresearch

राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संजय राऊतांना शिवसेना संपवायची होती; सेनेचे बंडखोर आ. संजय गायकवाड यांचा घणाघाती आरोप

खा. संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन १०० टक्के शिवसेना संपवायला निघाले होते, असा घणाघाती आरोप बुलढाण्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला.

MLA Sanjay gaikwad
आ. संजय गायकवाड

अकोला : खा. संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन १०० टक्के शिवसेना संपवायला निघाले होते, असा घणाघाती आरोप बुलढाण्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला. बुलढाणा येथे परतल्यावर त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. आ.गायकवाड यांनी खा.संजय राऊत यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली.

ते म्हणाले, ”संजय राऊत यांनी जर बाप काढला तर मलाही काढता येतो. ज्या ४२ जणांनी त्यांना मतदान केले  ते सर्व त्यांचे पण बाप आहेत. आधी खासदारकीचा राजीनामा द्या. मग आम्हाला सांगा.” राष्ट्रपुरुष कुणाचा व्यक्तिगत नसतो, देशाचा असतो. आमच्या प्रत्येक फलकावर बाळासाहेबांचे छायाचित्र असणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. जे जनतेतून निवडून येत नाही, त्याच चार पाच लोकांना तिकडे महत्व आहे. तेच चार पाच लोक उद्धव ठाकरेंकडे आहेत, असे ही गायकवाड म्हणाले..

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut end shiv sena rebels sanjay gaikwad allegations ysh