संभाजीनगर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला जाणार असल्याचं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. पण, संजय राऊत पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिले. यावरून ‘राऊत आले नाहीत का?’ असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“राऊत आले नाहीत का? तुमचे ते विकास राऊत,” अशी विचारणा एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

“मुख्यमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला”

यावर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या मनात थोडी धाकधूक होती. खरोखरच येणार नाहीत ना? शेवटी भुताटकी आहे. येऊन कोणाच्या मानेवरती बसणार नाहीत ना? पण, पत्रकार परिषद झाली. मुख्यमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला. नेहमीप्रमाणे आरोप करण्यात आले. संभाजीनगर आणि मराठवाड्याला फक्त घोषणाच मिळाल्या.”

हेही वाचा : “पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत, म्हणून…”, एकनाथ खडसे यांचं विधान; फडणवीसांवरही टीका

“एवढी भीती मनात बाळगू नये”

“मी पत्रकार परिषदेला येत असल्याने निर्बंध आणण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला फोटो असलेले पास देण्यात येत नाहीत. मात्र, मी येत असल्यानं फोटोचे पास देण्यात आले. एवढी भीती मनात बाळगू नये,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “२०१६ साली मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणांचं काय झालं?” विरोधकांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला पोलिसांचे फोन”

पोलिसांची तुमच्यावर पाळत होती का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “मी कार्यालयात बसल्यावर साध्या वेशातील पोलीस बाहेर उभे होते. मला चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना पोलिसांचे फोन आले.”