scorecardresearch

Premium

“पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत, म्हणून…”, एकनाथ खडसे यांचं विधान; फडणवीसांवरही टीका

“राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे, पण…”, असेही खडसेंनी फडणवीसांना सुनावलं.

eknath khadse pankaja munde
एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलले आहेत. ( फेसबुक छायाचित्र )

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी मोठी मदत केली. म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकले. पण, फडणवीसांनी व्यक्तीगत रित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली. हे मला योग्य वाटत नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझा हात आहे. २०१४ पूर्वी विधानसभेत मी जिथे बसायचो, त्याच्या पाठीमागील जागा मी फडणवीसांना दिली होती. विरोधी पक्षनेते असताना माझ्याऐवजी बोलण्याची संधी फडणवीसांना दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उललले. त्यांचं कौशल्यही त्यात होतं.”

sanjay raut prafull patel sharad pawar
नव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट, ‘त्या’ फोटोवर संजय राऊत म्हणाले…
devendra fadnavis jayant patil
“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना गणरायाने सुबुद्धी द्यावी”, जयंत पाटलांच्या विधानावर फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…
Eknath Khadse criticizes Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीस माझ्यामुळेच मुख्यमंत्री”, नाथाभाऊ स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्यांची सुडाची वृत्ती…”
sachin-ahir
“शिंदे- फडणवीस सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून…” सचिन अहिर यांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा : VIDEO : “२०१६ साली मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणांचं काय झालं?” विरोधकांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

“नंतरच्या कालखंडात फडणवीसांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी फार मदत केली. म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकले. मात्र, व्यक्तीगत रित्या माझा छळ करण्याची भूमिका त्यांनी घेतली. हे मला योग्य वाटत नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. पण, सुडाचं राजकारण महाराष्ट्राला शोभत नाही,” अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांना सुनावलं आहे.

हेही वाचा : “…तर खासगी कंपन्यांना १५०० कोटी द्यावे लागतील”, कंत्राटी नोकरभरतीवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

तुमच्याबरोबर विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अन्याय झाला का? या प्रश्नावर एकनाथ खडसे यांनी म्हटलं, “विनोद तावडे सावरले आहेत. ते महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेत. पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत. म्हणून त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतला नाही. मी निर्णय घेऊन वेगळी दिशा आणि मार्ग अवलंबला. पंकजा मुंडे यांना काही सल्ला देऊ अशी स्थिती नाही. पंकजा मुंडे परिपक्व आहेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath khadse on pankaja munde attacks devendra fadnavis ssa

First published on: 16-09-2023 at 15:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×