नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील, असा दावा बडनेराचे आमदार रवी राणा यांनी काल माध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, रवी राणांच्या या दाव्याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी रवी राणांच्या दाव्याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, रवी राणा यांचा आताच राजकारणाशी संबंध आला असून त्यांनी आमच्या पक्षाच्या भूमिकेवर बोलावं, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What Bhujbal Said About Raj Thackeray ?
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”
What Bhujbal Said About Sharad Pawar?
शरद पवारांचं बोट पुन्हा धरणार का? छगन भुजबळांचं उत्तर, “मी…”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Chhagan Bhujbal Big statement
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ नाराज आहेत?; उत्तर देत म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो..”
sharad pawar
शरद पवार शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, “मी गेल्या एक वर्षापासून…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

रवी राणा यांचा आताच राजकारणाशी संबंध आला आहे. मात्र, शिवसेना पक्ष हा देशाच्या राजकारणातला सर्वात जुना पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंनी या पक्षाची सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे हे १५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. आमच्या पक्षाचे १८ खासदार देखील निवडून आले आहेत, अशा पक्षाच्या भूमिकेवर राणांसारख्या व्यक्तीने बोलावं, योग्य नाही, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. पुढे बोलताना, रवी राणा यांनी त्यांचं राजकारण बघावं आणि निवडणुका लढवाव्या ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका काय आहेत. ते आम्ही ठरवू, असा इशाराही त्यांनी दिला.

रवी राणा नेमकं काय म्हणाले होते?

रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे एनडीएबरोबर दिसतील, असा दावा केला होता. “मी आपल्याला सांगतो की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलले आहेत. मात्र, आता मी जबाबदारीने सांगतो की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते दिसतील. कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे. देशाचं भविष्य उज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे”, असं रवी राणा यांनी म्हटलं होतं

महत्त्वाचे म्हणजे रवी राणांच्या दाव्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य केलं होतं, “या गोष्टी जर तरच्या आहेत. त्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) यावं की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसंच त्यांना घ्यावं की नाही हे ठरवणारे उद्धव ठाकरे नाही तर ते नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.