राज्यात भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत एमआयएम पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन लढण्याची ऑफर दिली आहे. एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार असलेल्या एमआयएमची राष्ट्रवादीला असलेली ऑफर सध्या चर्चेत आली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांच्यात झालेल्या  भेटीनंतर ही चर्चा सुरु झाली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना एमआयएमसोबत उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे.

 “महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. एमआयएम आणि भाजपाची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. जे आधीच भाजपाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

“एमआयएम भाजपाची बी टीम असल्याचे आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे. जर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव करायचा होता तर त्यांनी खूप काळजीपूर्वक पावले टाकायला पाहिजे होती. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि राज्यातल्या कोणत्याही पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही. ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे ती त्यांना लखलाभ ठरो,’ असे संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले इम्तियाज जलील?

राष्ट्रवादी काँग्रेसलाच एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी युतीसाठी ऑफर दिली आहे. “आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, असं इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.