विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांबद्दल बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं.” यावेळी राऊत म्हणाले की, “अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात.” राऊत यांचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे होता. मुख्यमंत्र्यांवरील या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.

शिरसाट म्हणाले की, मुळात संजय राऊत हे जुगाडामुळे खासदार झाले आहेत. त्यांना खासदारकी मिळत नव्हती. तेव्हा ते एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते. राऊत शिंदेंना म्हणाले की, माझी शेवटची टर्म आहे मला यावेळी साथ द्या. नाहीतर त्याला (संजय राऊत) आम्ही कधीच पाडलं असतं. आमची मानसिकता तिच होती. परंतु त्यावेळी शिंदे साहेब म्हणाले नको, जाऊ दे यावेळी त्याला निवडून आणू. ही त्याची शेवटची टर्म आहे. त्यामुळे जुगाडामुळे खासदार झालेला हा संजय राऊत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरसाट एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले की, त्यावेळी दोन संजय निवडणुकीला उभे होते. दुसरा संजय निवडून आला पाहिजे होता हे आमचं प्रामाणिक मत होतं. परंतु ‘मातोश्री’ने या संजय राऊतला प्राथमिकता दिली. त्यामुळे संजय राऊत हा अर्ध्या मताने निवडून आला. अर्ध्या डोक्याचा माणूस अर्ध्या मतावर निवडून आला.