Sanjay Shirsat on Shivsena Bhavan: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर देखील हक्क सांगत कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर शिंदे गट शिवसेना भवन आणि पार्टी फंडवर देखील हक्का सांगणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर आता शिंदे गटाने मोठं विधान केलं आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले, “आमची लढाई ही पक्षाचा फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती. आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह महत्त्वाचं होतं. ते मिळाल्यानंतर आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायची होती म्हमून आम्ही विधीमंडळातील कार्यालयात जमलो होतो. शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. जरी काही लोकांना ती प्रॉपर्टी वाटत असली तरी आमच्यासाठी ती प्रॉपर्टी नाही. शिवसेना भवनाच्या रस्त्यावरुन जरी आम्ही कधी गेलो तर शिवसेना भवनाला नमन करु.”

हे वाचा >> विश्लेषण: ठाकरे गटापुढे आता पर्याय कोणता?

आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत

माध्यमांशी बोलत असताना आमदार संजय शिरसाट यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आमची प्रामाणिक भावना आहे. आम्हाला पैशांचा लोभ नाही. शिवसैनिकांना जे पाळीव कुत्रा संबोधतात, अशा लोकांचे ते काम आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत. तसेच राज्यभरात असलेल्या शिवसेनेच्या शाखा या ट्रस्टच्या माध्यमातू उघडल्या आहेत, ती त्या ट्रस्टची मालकी असू शकते. शाखेची अदलाबदल काही होणार नाही. तसेच शिवसैनिकांमध्ये याबाबत कधीही भांडण होणार नाही”, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

हे वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानामुळं संजय राऊत अडचणीत; नाशिकमध्ये गुन्हा दाखल

संजय राऊत यांनी दोन हजार कोटींचा आरोप लावून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली होती. या आरोपावर बोलत असताना शिरसाट म्हणाले, “संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून अशा माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही. तसेच निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृतपणे पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, हे राऊत यांना माहीत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच संजय राऊत जी भाषा वापरत आहेत, त्या भाषेला आम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन उत्तर देणार नाही. उलट त्यांनी जे मुख्यंमत्र्यांबद्दल जे आक्षेपार्ह विधान केले होते, त्याबाबत त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच कुत्रा पिसाळला तर त्याला आपण चावत नाही, तर त्याला औषध देतो. त्याप्रमाणे संजय राऊत यांनाही औषध दिले जाईल, असेही सुतोवाच संजय शिरसाट यांनी केला.