मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उघड दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. तर शिंदे गटातील आमदारदेखील तेवढ्याच क्षमतेने उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. दरम्यान, शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी आमच्या नादाला लागू नका. तुम्ही आरे कराल तर कानाखाली आवाज काढू, असा इशारा विरोधकांना दिला आहे. ते हिंगोलीमध्ये सभेला संबोधित करत होते.

हेही वाचा >>> आणखी २ हजार कोटींचा घोटाळा? किरीट सोमय्यांच्या दाव्यामुळे खळबळ, म्हणाले “संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”

“काल परवा येथे दहा पाच लोकांनी सभा घेतली. ती सभा होती का? आम्हाला डिवचण्याचे काम करू नका. आमच्या नादाला लागू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला आरे म्हणाल तर कानाखाली आवाज काढू,” असे संतोष बांगर म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपामध्ये मोठे फेरबदल, अशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमदारांच्या बंडखोरीमुळे शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच पक्षवर्चस्वासाठीचे पुरावे सादर करण्यासाठी आणखी चार आठवड्यांचा वेळ द्यावा, अशी मागणीही ठाकरे गटाने केली आहे.