छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला स्वायतत्ता देण्यात आली आहे. गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार संभाजीराजे यांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.”सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलिकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. पहिलं उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

सारथी ही संस्था नियोजन विभागाच्या अंतर्गत असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार आहे. तारादूत प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सारथी संस्थेने दिलेल्या स्वायत्तेचा लाभ घेवून आर्थिकदृष्टया गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने त्याप्रमाणे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

“घरातून करतोय तर एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर….!” विरोधकांना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!

“कोल्हापूरला मूक आंदोलन झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेतली गेली. अजित पवार यांच्यासोबत सारथीबाबत बैठक झाली. ही चांगली सुरुवात आहे. सारथी ही मराठा समाजासाठी कणा आहे.आम्ही १४ मागण्या अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. सारथीला पूर्णपणे स्वायतत्ता देण्यात आली आहे. आता उपकेंद्राची घोषणा २६ जूनला होणार आहे. कोल्हापूरला सारथीचे उपकेंद्र होणार आहे. लोकांना वाटतं मला सारथीवर काम करण्याची इच्छा आहे. पण तसं काही नाही”, असं खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातली गर्दी पाहून अजितदादा म्हणाले, “उद्घाटन न करताच निघून जावंसं वाटलं!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नाशिकचं मूक आंदोलन आम्ही मागे घेतलेलं नाही. ठरल्याप्रमाणे आंदोलन २१ तारखेला आहे. त्यानंतर तिथे राज्याचे सर्व समन्वयक येतील. चर्चा करतील. आणि पुढची दिशा ठरवतील.” असंही ते पुढे म्हणाले