Lata Mangeshkar Passes Away : “भारतरत्न लता मंगेशकर उर्फ लतादीदींच्या जाण्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात जी पोकळी आणि वेदना उत्पन्न झाली आहे. तिचं शब्दांमध्ये वर्णन करणं कठीण आहे. आठ दशकांहून जास्त भारतीयांच्या मनावर स्वर वर्षा करत, त्यांना भिजवती, तृप्त करत, शांत करत चाललेला हा स्वर आता तो आनंदघन बरसणार नाही.” अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वच स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Court Grants Pre Arrest Bail, Rashtriya Swayamsevak Sangh, name misusing Case, rss name misusing Case, Pre Arrest Bail, rss, marathi news, nagpur news,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग, न्यायालय म्हणाले…
NCP Sharad Pawar group has filed its candidacy of Dhairyashil Mohite-Patil in Madha
माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल
Rashtriya Swayamsevak Sangh Sarsanghchalak Dr Mohan Bhagwat in Mehkar
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मेहकरात! स्वयंसेवकांना कानमंत्र
Eknath khadase and sharad pawar
“शरद पवारांचा मी ऋणी, संकटाच्या काळात मला…”, भाजपात परतणाऱ्या एकनाथ खडसेंचं विधान चर्चेत

Lata Mangeshkar Passes Away Live : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

“लतादीदींचं जीवन हे शुचिता आणि साधनेची तपस्या यांचं मूर्तीमंत उदाहरण आहे. संगीताच्या क्षेत्रातली त्यांची साधना आणि आठ दशकांच्या वर गायन केल्यानंतर विश्वमान्यता मिळाल्यावरचं देखील प्रत्येक गाण्याच्या तयारीसाठी, एक-एक बारीक गोष्ट त्याचा अभ्यास करून, त्यांचं गाणं हे तर सगळ्यांना माहिती आहे. संगीतातली त्यांची साधना ही पुष्कळ जणांना माहिती आहे. परंतु त्यांचं जीवनच एकूण सर्वांगीन दृष्टीने पवित्रतेचं आणि तपस्येचं जीवन होतं.” असं सरसंघचालक एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत.

Lata Mangeshkar Passes Away : केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला – देवेंद्र फडणवीस

तसेच, “आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबीक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये हा परिश्रमांचा आणि तपस्येचा आदर्श त्यांनी उभा केला. एक सार्थक आणि यशस्वी दोन्ही अंगानी चांगलं जीवन आपल्यासमोर आपल्या जीवनातून तपस्येतून उभं केलं. त्यांच्या स्वरांच्या रूपाने त्या अमर राहतील. परंतु पार्थिव रूपाने प्रत्यक्ष त्यांच्या त्या गात आहेत, असं दृश्य ऐकणं आणि पाहणं या दृष्टीने आणि आपण एका अनुभवाला पारखे झालो आहोत. त्यांच्या त्या पवित्र स्मृतीस मी माझ्या तर्फे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो, की आम्हा सर्व भारतीयांना मंगेशकर कुटुंबीयांबरोबरच हा आघात सहन करण्याचं धैर्य भगवंताने प्रदान करावं.” अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Lata Mangeshkar Passes Away : लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.