साताऱ्यात अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलांनी चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.या दोन्ही प्रकरणात मुली गर्भवती राहिल्यानंतर व त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिली घटना घडली साताऱ्यातील वनवासवाडी इथं. या मुलीवर अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आलं. याप्रकरणाती संशयित विधीसंघर्षित बालक असल्याने त्याच्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एका सोळा वर्षाच्या मुलीचा अज्ञानाचा गैरफायदा घेवून वनवासवाडी परिसरातील संबंधित विधी संघर्षित बालकाने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडून गर्भपात करवला. तसेच याबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिस उप निरिक्षक भगत तपास करत आहेत.

हेही वाचा- बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला राहिला गर्भ; TikTok स्टारला पोलिसांनी केली अटक

तर दुसऱ्या घटनेत जावळी तालुक्यातील इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातल्या मुलांनी वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही मुलगी गर्भवती असल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत मेढा पोलिस स्थानकात पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली असून, दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांना बालसुधारगृह म्हणजेच रिमांड होम, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे.

जावळी तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहत होती. तिच्याच वर्गात शिकत असलेली दोन मुले या मुलीच्या शेतातल्या घरी आले. घरात कोणी नसताना चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील करण्यात आले. मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे व शेतातल्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत एक महिना सातत्याने दोन्ही अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला असल्याची तक्रार देखील अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत दिली आहे. मात्र भीतीमुळे या मुलीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara crime news minor boys raped minor girls one of them got pregnant crime news vsk
First published on: 19-06-2021 at 20:16 IST