सातारा: सातारा जनता सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लादलेले सर्व निर्बंध मागे घेतले असून आता कर्जवितरणासह अन्य व्यवहार सुरू करण्याची परवानगी बँकेस दिली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली.

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त जनता सहकारी बँकेवर गेल्या दहा वर्षांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही निर्बंध लादले होते. रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक वर्ष २०२२-२३ अखेरची बँकेची तपासणी तसेच २०२४-२५ पर्यंतचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. सन २०२२-२३ पासून बँकेच्या आर्थिक स्थितीचा रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी आढावा घेवून बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने गेली १० वर्षे लागू केलेले सर्व निर्बंध रिझर्व्ह बँकेकडून मागे घेतले आहेत. त्यामुळेच बँकेच्या संचालक मंडळाने, बँकेच्या सभासदांकडून वारंवार मागणी केल्याप्रमाणे विनातारण कर्ज सुविधा सुरू करण्याचा निर्णय प्राधान्याने व तत्परतेने घेतला आहे. त्याप्रमाणे यापूर्वी ज्या सभासदांनी बँकेकडील विनातारण सामान्य कर्जाची वेळेत व नियमितपणे परतफेड केली आहे.

अशा सभासदांनी विनातारण कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा, याकरिता बँकेकडून विनंती पत्र पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बँकेने या संदर्भात तयार केलेल्या विनातारण सामान्य कर्ज योजनेची प्रत बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सर्व सभासदांनी या योजनेचे अवलोकन करण्यासाठी बँकेच्या नजीकच्या शाखेस भेट देऊन, योजनेचे अवलोकन करून विनातारण सामान्य कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्यास परवानगी मिळणे बाबतचा प्रस्ताव शिथिल झाल्याने नजीकच्या काळात निश्चितच मंजुरी मिळेल, अशी माहितीही श्री. मोहिते यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त जनता सहकारी बँकेवर गेल्या दहा वर्षांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही निर्बंध लादले होते. रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक वर्ष २०२२-२३ अखेरची बँकेची तपासणी तसेच २०२४-२५ पर्यंतचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. सन २०२२-२३ पासून बँकेच्या आर्थिक स्थितीचा रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी आढावा घेवून बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने गेली १० वर्षे लागू केलेले सर्व निर्बंध रिझर्व्ह बँकेकडून मागे घेतले आहेत.