वाई: सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपची असून पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असला तरी जागा वाटपाची तिन्ही घटक पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवार यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.

मागील तीन वर्षांपासून पक्ष बांधणी करत आहे. राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय पक्षनिरीक्षकांचा सातत्याने येथे दौरा सुरू आहे. सध्या आठही विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य वाढले असून भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपचीच आहे. कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभेची जागा भाजपचा उमेदवार लढवणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी रविवारी सातारा येथे पत्रकार परिषद घेत सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.

आणखी वाचा-बीआरएसमध्ये गेलेल्यांची घरवापसी- आ. जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा दावा हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. जागा वाटपाची तिन्ही घटक पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. लोकशाहीमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे या जागेवर सातत्याने दावा केला जाऊ शकतो. मात्र भाजपचा जिल्हास्तरीय रचनेमध्ये सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोणी किती दावा केला तरी सातारा लोकसभेची जागा भाजपचा उमेदवारच लढणार असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीने सुद्धा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे याबाबत ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात मजबूत होता हा भूतकाळ झाला आता सध्या परिस्थिती तशी राहिलेली नाही राष्ट्रवादीची ताकद आता दोन गटात विभागली आहे. त्यामुळे भाजपच बलाढ्य पक्ष ठरलेला आहे.आमदार शशिकांत शिंदे यांनी आपले स्वतःचे बघावे दुसऱ्याचे पक्षात डोके घालू नये.शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी ही हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. या सर्व चर्चांचे गोरे यांनी खंडन केले.सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याने येथील उमेदवारी संदर्भात सुरू झाल्या आहेत.