गोकुळचे केवळ दोन वर्ष कशाला, २५ वर्षांचे लेखापरीक्षण करा, अशी मागणी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केली आहे.
गोकुळ विरोधी गटातील संचालिका शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या कारभाराचा भांडाफोड करण्याचा इशारा दिला होता. पाठोपाठ लगेचच गोकुळचे चाचणी लेखापरीक्षणाची करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर सतेज पाटील यांनी गोकुळची मागील चौकशीची मागणी केल्याने पाटील -महाडिक वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा- राज्याला मिळणार ६३ नवीन न्यायाधीश, प्रथम न्यायदंडाधिकारी परीक्षेत सुबोध भैसारे राज्यातून प्रथम

महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसचेच सुनील केदार दुग्धविकास मंत्री होते. आम्ही ठरवले असते तर गोकुळ बरोबर राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. आम्ही सत्तेचा वापर करून कुणावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही, असे सतेज पाटील म्हणाले.

हेही वाचा- “संसार सुरू झाल्याशिवाय माणूस….” भरत गोगावलेंचा आदित्य ठाकरेंना टोला

उमेश आपटे परतणार

दरम्यान, आजरा तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी काल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी उमेश आपटे यांचा गैरसमज झाला आहे. तो दूर करू. ते काँग्रेसमध्ये लवकर सक्रिय होतील, असा विश्वास व्यक्त केला.