वाळूची मालमोटार तहसीलदाराच्या अंगावर घालणाऱ्या वाळूतस्कराला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना कैदेत ठेवण्याचा आदेश आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी. डिग्रसकर यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. वाळूतस्कर पोपट धाडगे (रा. राहुरी) याला शिक्षा देण्यात आली आहे.
राहुरीचे तत्कालीन तहसीलदार राजेंद्र वाघ (सध्या बीडमध्ये उपजिल्हाधिकारी) व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पथक १५ मे २०१२ रोजी सायंकाळी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडण्यासाठी जात होते. नगर ते मनमाड रस्त्यावरील राहुरीतील दत्त मंदिरासमोर वाळूची मालमोटार (एमएच १६ एई ३७३७) जाताना दिसली. त्यांनी ती मालमोटार थांबवली. त्यात २ ब्रास वाळू अधिक आढळली. परवान्यातही खाडखोड दिसली. त्यामुळे त्यांनी चालक पोपट धाडगे याला मालमोटार तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. तहसीलदार वाघ त्यांच्या जीपमध्ये बसले असता धाडगे याने भरधाव मालमोटार वाघ यांच्या जीपवर घातली. चालकाने प्रसंगावधान राखून जीप बाजूला घेतली. परंतु मालमोटार भरधाव वेगात निघून गेला.
तहसील कार्यालयातील लिपिक सुभाष विठोबा ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिसांनी धाडगे विरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक मुत्याल यांनी केला. धाडगे याला सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून शिक्षा देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
राहुरीत तहसीलदाराच्या अंगावर गाडी घालणा-या वाळूतस्कराला सक्तमजुरी
वाळूची मालमोटार तहसीलदाराच्या अंगावर घालणाऱ्या वाळूतस्कराला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना कैदेत ठेवण्याचा आदेश आहे.
First published on: 24-04-2015 at 03:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Servitude to sand mafia in tahsildar case in rahuri