लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : ज्या दिव्यांगाविषयी सहानुभूती बाळगली जाते, त्याच एका दिव्यांग तरूणाने चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना करमाळा तालुक्यात घडली आहे. संबंधित दिव्यांगाविरूध्द करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची करमाळा तालुक्यातील घटना ताजी असतानाच याच तालुक्यात एका गावामध्ये एका ३० वर्षांच्या दिव्यांग तरूणाने ओळखीचा फायदा घेऊन एका चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

आणखी वाचा-विलंबाने वीज देयक भरल्यास किती दंड बसतो माहीत आहे काय? मग हे वाचाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित चिमुरडीचे आई-वडील ज्या गावात राहतात, त्याच गावात आरोपी दिव्यांग तरूण राहतो. त्याची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी चांगली ओळख आहे. स्वतःच्या आई-वडिलांच्या प्रेमाच्या शिवाय दुसरा स्पर्श माहीत नाही, अजून शाळेला जायलाही सुरूवात केली नाही, अशा लहानग्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिच्या आईला लक्षात आले आणि हे चौकशी केली असता हे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाचे नाव समोर आले. पोलिसांनी दिव्यांग तरूणाला अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उभे केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.