भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच, भू-विकास बँकेकडून सरकारला येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. त्यावरून आता भू-विकास बँकेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिंदे-भाजपा सरकारची पोलखोल केली आहे.

शरद पवारांनी पुरंदर येथे शेतकऱ्यांनी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, “राज्य सरकारने भू-विकास बँकेचे कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं. गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेचे कर्ज एकाला तरी मिळालं का? भूविकास बँक अस्तित्वात आहे का? भूविकास बँक होती का? याची माहिती नाही. २५ ते ३० वर्षे झाली बँकेची कोणी कर्ज वसुली केली नाही. राहिलेली वसुली होणार नाही हे कळल्यावर, कर्ज माफी देण्यात आली. ‘लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं’ असं भाजपावल्याचं काम आहे,” अशी अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

हेही वाचा : “कुणी सांगितलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं?”, शरद पवारांची तुफान फटकेबाजी

तसेच, राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यावर बोलताना “अतिवृष्टीने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई केंद्र आणि राज्य सरकारने करावी म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. यासाठी संघर्ष करावा लगाला तर चालेल,” असेही शरद पवारांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.